Posts

Showing posts from October, 2022

💁‍♂विलक्षण विपरीत🤦‍♂

लहानपणी जे जे करायला गेले की, कुणी तरी नकार घंटा वाजवायचेच.झाडावर चढू नकोस,सूरपारंब्या खेळू नकोस, विहीरीत उतरू नकोस, आणि पाटात किंवा चारीत अज्जीबात पोहायला जाऊ नकोस.हे सगळे करायला तू काय पोरगा आहेस का?पण या सर्व गोष्टी मी एकदाच नाही तर अनेकदा केल्या.पण अर्थातच सर्वांचा डोळे चुकून.बोरीची बोरे तोंडाने तोडून खाण्यात जी मजा यायची,ती दगडाने पाडून खाण्यात मुळीच येत नसायची.जांभळांची सेम तीच तऱ्हा होती.कुठल्याही झाडाच्या शेंड्यावर चढून जाण्यात जी नशा होती ती,आज कशातही नाही.झाडाच्या फांदीला,वडाच्या पारंबीला पकडून झोका खेळण्यात जे सुख,जो आनंद होता तो पार हरवून गेला आहे.माझ्यावर सर्वांची सक्त नजर असायची.पण मी सर्वांची नजर चुकवून झाडावर पण चढायचे, आणि विहिरीत पण उतरायचे.आणि आता साठ वर्षांनंतर सगळे सल्ला देतात.जंप मारा, व्यायाम करा.खूप चाला, खूप पळा.हे करा, आणि ते करा. आता जागेवरून उठायचा पण कंटाळा येतो.जेंव्हा खूप पचवू शकत होतो, तेंव्हा प्रमाणातच, मोजकेच खायला मिळायचे.आता खाद्य पदार्थांची रेलचेल आहे तर खावू शकत नाही,खाल्लेच तर नीट पचत नाही.असे विलक्षण विपरीत जीवन असते माणसाचे.लहानपणी इतक्या उड्या ...

😀 साखरबाई झाली कडूबाई 😝

पूर्वी किती कौतुक आणि मान होता साखरेला.साखरेचा खाणार,त्याला देव देणार.ही म्हण प्रचलित होती.आपले काम करून घ्यायचे असेल तर थोडी साखर पेरणी करावी लागेल.असा सल्ला मिळायचा.चार माणसें लोकं जोडायचे असतील तर जिभेवर थोडी साखर ठेवावी लागते.असे अभिमानाने सांगत.पण काळ बदलला तसे साखरबाईचे नशीबही बदलले.दलबदलू नेत्याने पक्षांतर करावे,तसे साखरबाईचे झाले.तिला थेट शत्रूपक्षातच नेऊन बसविले.तिलाच नाही,जेजे मित्र वाटत होते,ते आपले शत्रू कसे आहेत,हे तासनतास लोकांना पटवून दिले अनेक डॉक्टरांनी.षडरिपूअसतात ना,राग,लोभ,द्वेष,मत्सर,स्वार्थ, आणि घमेंड.त्याप्रमाणेच हे पाच शत्रू आहेत असे सांगितले.पांढरा रंग शांतीदूत मानतात.पण हे पाच पांढरे आपले शत्रु कसे आहेत हे पून्हा पून्हा, पून्हा पून्हा पटवून देण्यासाठी खूप कष्ट घेतले सर्वांनी.म्हणजे,साखर,मैदा,मीठ ,पांढरा भात आणि दूध.खरे तर हे सर्वांचे लहानपणापासूनचे सवंगडी, मित्र यांच्या वाचून कुणाचेही पान हालत नाही.जेवणाची आणि दिवसाची सुरुवात यांच्या पासून आणि शेवटही यांच्या बरोबरच.पण मधुमेहामुळे यांनाही शत्रूपक्षात नेऊन बसविले आहे.त्यामुळे ज्यांना मधूमेह नाही, त्यांनीही या सर...

🌳विस्तारलेला, वटवृक्ष🌳

हो, यापेक्षा दूसरी उपमा लागू पडणार नाही, आणि शोभणार तर मुळीच नाही, माननीय,आदरनीय उमेश सरांना.कारण त्यांचे कार्य नीट समजून घेतले तर कळते की हा माणूस म्हणजे विस्तार वाढलेला वटवृक्ष आहे.याला वटवृक्षच का म्हणायचे? आम्रवृक्ष पण काही कमी नाही.पण आंब्याची फळे शेकड्याने,डझनाने,किलोने मोजता येतात,पण वटवृक्षाचे आपण काहीच मोजमाप करू शकत नाही.🌲सुरूचे झाड आकाशाला गवसणी घालण्यासाठी जोमाने वरती झेपावते.ना त्याला फळे येतात, नाही त्याची सावली फारशी उपयोगी पडते.वटवृक्षाचे तसे नाही.त्याचा विस्तार हळूहळू वाढतो,पण सर्वांगाने सारखाच वाढतो.याच्या फांद्या एकात एक इतक्या घट्ट गुंफल्या जातात की, बाराही महिने थंडगार सावली मिळते.त्याच्या हिरव्या गार दाट सावलीत अनेक जण विसावतात.सर्व प्रकारचे पक्षी आपले निरनिराळ्या प्रकारचे सुंदर घरटे बांधून सुखाने झाडावर राहतात. दूरदूरवर फांद्या विस्तारलेल्या असतात.पण पारंब्या मात्र पून्हा जमिनीवरच झुकतात.जन्मदात्रीला विसरतच नाहीत.ह्या वटवृक्षाचे सर्व गुण आपल्या उमेश सरांमध्ये आहेत.१०८वेळा रक्तदान म्हणजे साधी गोष्ट नाही.सगळ्यांसाठी तळमळ, कळकळ हे सर्व तर आहेच.पण समाजकार्यातही ते क...

वाट पहाणे ( इंतजार )

खरंच शब्द तसा छोटाच आहे.पण अर्थ खूप मोठा आहे.माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत फक्त वाटच पहात असतो.बाळ जन्माला कधी येणार म्हणून घरातील सर्व जण आतुरतेने वाट पहात असतात.जन्माला आले की,ते चालणार कधी, बोलणार कधी,जेवणार कधी याची वाट पाहायची.दात आले की नाही, कधी येतील ती वाट पहायची.मग त्याला चांगल्या शाळेत प्रवेश कसा मिळेल याची वाट पाहत बसायचे.शिक्षण , रिझल्ट,डिग्री आणि नोकरी याची सुद्धा,प्राण एकवटून वाट पहावी लागते.एकापेक्षा जास्त मुले असतील तर वाट पहाणे आणखीनच वाढते.मग लग्न ठरण्याची,घरात,सून,जावयी येण्याची वाट पहायची.असे हे वाट पहाणे संपतच नाही. आठ महिने झाले, आपण डोळ्यात प्राण आणून वाट पहात आहोत.लॉकडावून कधी संपेल,आपण मोकळा श्वास कधी घेऊ?कोरोना कधी जाईल,?कोरोनाची लस कधी येईल? नुसते वाट पहाणे.हॉस्पिटलमध्ये गेले की,आपला नंबर येण्याची वाट पहात बसणे, अपॉइंटमेंट घेतलेली असते तरी डॉक्टरांची वाट पहात बसणे.पण तोंडातून एक शब्द न काढणे.आता तर मास्क लावलेला असतो त्यामुळे बोलायचा प्रश्नच नाही.तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा.त्याशिवाय दूसरा पर्यायच नाही.गेले कित्येक वर्षे अच्छे दिन कब आयेंगे...

🌹गुड मॉर्निंग🙋‍♂🌹

काय आहेत हे गुड मॉर्निंगचे संदेश? हे आपल्याला सकाळी सकाळी मिळालेले एनर्जी अमृत आहे.फोन उघडताच असंख्य असे संदेश आलेले दिसतात.हाबघू,की,तो बघू असे होऊन जाते.आपण आपल्या सर्वात जास्त आवडत्या व्यक्तीचा मेसेज डोळे चोळीत चोळीतच सर्वात प्रथम वाचतो.आणि तीच एनर्जी घेऊन आपण भराभर पुढचे मेसेजेस वाचतो.कुणी अध्यात्मावर अधारीत, गाणे,प्रवचन आरती ,बोधपर लेख पाठविलेले असतात,तर काहींना सकाळी सकाळी विनोद पाठवायची लहर येते.काही आपल्याला दम देऊन,धमकी देऊनच खूप गोष्टी करा असे मेसेज पाठवितात.पण आपण मात्र सर्वात जास्त आवडलेला मेसेज डोक्यात ठेवून कामं आवरतो. काही कारणाने मन उदास असेल तर एखाद्याच्या मेसेजने मनातल्या मनात हसू येते.मन प्रसन्न होते.महत्वाच्या कामाला जायचे असेल तर, बेस्ट लक, हार्दिक शुभेच्छा!हा मेसेज आपल्याला खूप ताकद देऊन जातो.मन दुःखी असेल आणि कुणी सांत्वनपर मेसेज पाठविला तर दुखऱ्या भागावर कुणी तरी हळूच फुंकर घातली असे वाटते.दुख हलके होते.गाणे,भजन,किर्तन, भावगीत, भक्तीगीत, अभंग वाचून मन पवित्र होते, शांत होते.सिनेमाची गाणी,नवी जूनी ऐकत ऐकत काम करणे यासारखे सुख या पृथ्वीवर दूसरे कोणतेच नाही, असे मला...

चिंधी

कालचीच गोष्ट आहे.लॉकडावूनमुळे बऱ्याच गोष्टी असूनही आपल्या घरात आणणे मुश्कील झाले आहे.असेच एका ओळखीच्या भाजीवालीने, मला लोणच्याची कैरी आणून दिली.पण ती तशीच फोडून दिल्यामुळे अतिशय खराब दिसत होती.ती सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यावे असे मला वाटले.पण दुर्दैव असे की,घरभर शोधले तरी सुती कपडा काही सापडला नाही.टेरीन,टेरीकॉट, नायलॉन,शालू, पैठणी सगळे दिसले,दिसला नाही तो सुती कापडाचा एक तुकडा.शेवटी एक ओढणी फाडून त्या कैऱ्या स्वच्छ केल्या.स्वच्छ करता करताच आईचे वाक्य आठवले.माझे बोट कापले होते, तेंव्हाही आईला माझ्या घरात चिंधुक सापडले नव्हते पटकन बोटाला गुंढाळायला. आई म्हणाली होती तुमच्या पिढीला खूप ऐश्र्वर्य लाभले आहे.शालू पैठण्या सगळे आहे.पण एक साधी चिंधी नसते तुमच्याकडे.अग,बोट कापले तर त्याला चिंधीच गुंडाळायची असते.द्रौपदीने भरजरी शेला फाडून कृष्णाच्या बोटाला बांधली होती.त्या मोबदल्यात वस्त्रहणाच्या वेळी कृष्णाने द्रौपदीला अगणित वस्त्र पुरविले होते.इतके मोठे महत्त्व या छोट्याशा चिंधीत आहे.त्यामुळे आपण एक तरी सुती कापड घरात ठेवायलाच पाहिजे असे काल मला प्राकर्षाने जाणवले.सुती कापड उन्हाळ्यात गारवा ...

🌱माझा परिचय🌳: सौ. कमल उत्तम सोनजे : मराठी लेखिका व कवयित्री

                 माझे नाव सौ.कमल उत्तम सोनजे.माहेरचे नाव कमल लक्ष्मण खाडे.माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला.माझे आई-वडील फक्त निरक्षर होते पण बाकी ते सर्व गोष्टीत अतिशय हूशार आणि, फार कष्टाळू होते.आम्ही एकूण दहाजण बहिण भाऊ होतो.पण आम्हाला आई-वडिलांनी उत्तम प्रकारचे संस्कार दिले आहेत.                मी सर्वांत लहान आहे. मी दोन तीन महिन्यांची असतानाच वडील वारले.त्यानंतर आई आणि मोठी बहीण भाऊ माझे पालक झाले.घरात सर्वजण मोठे असल्याने मित्र-मैत्रिणी कुणीच नव्हते.त्यामुळे गाईची वासरे,बकऱ्या, कोंबड्या, फुलझाडे हेच माझे सवंगडी झाले.दिवसभर त्यांच्याशी खेळणे,गप्पा मारणे यातच दिवस आनंदात जात असे.निसर्गातील सर्व ऋतु जवळून पाहिले,अनुभवले, त्यातील निरनिराळे बदल,बहर सर्व पहातांना मनाला अतिशय आनंद होत असे.शाळेत निबंध लिहायला सांगितला तर मी खूप खूप सुंदर लिहायचे.माझा निबंध वर्गात वाचून दाखवायचे,गुरूजी, बाई, नंतर मॅडम! आणि मग माझी लिहिण्याची आवड वाढतच गेली.सोळा वर्षांची झाले आणि आईच्या हट्टी आग्रहामुळे माझे लग्...