😀भाषेची गंमत😆
माझे लग्न झाले तेंव्हाची खरी घडलेली गंमत आहे.माझे माहेर श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव.आणि सासर देवळा तालुक्यातील वखारी पिंपळगाव.हे सांगायचे कारण म्हणजे माझी मातृभाषा मराठी, आणि सासूभाषा अहिराणी.सोळाव्यावर्षी लग्न झालेल्या मला पूर्ण ज्ञान किंवा अक्कल कशाचेही नव्हते.सासरी जाण्यासाठी आम्ही श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर थांबलो होतो.रात्रीचे अकरा वाजले होते.मी आणि माझी कलवरी संकोचून उभ्या होतो.बाकीचे सगळे अहिराणी मधून बोलत होते. आम्ही बावरून गेलो होतो.तेवढ्यात माझ्या सासूबाई आम्हाला म्हणाल्या,"पोरीसहो बशी घ्या."आम्ही दोघींनी एकमेकीकडे नाक मुरडत बघितले, आणि हळूच कुजबुजलो, आत्ताच तर जेवणं करून निघाले, आणि लगेच बशी कशाला पाहिजे यांना हू.!परत माझ्या सासूबाई जरा मोठ्यानेच म्हणाल्या,""अग पोरीसहो बशी घ्या ग" समोरच रेल्वेचे कॅन्टीन होते.मी भाचीला म्हणाले,चल तिथून आणून देऊ बशी यांना.कशाला पाहिजे काय माहित? मग नवरदेवाच्या लक्षात हा सर्व प्रकार आला.त्यांनी आम्हाला थांबवले आणि सांगितले की,बशी घ्या म्हणजे खाली बसून घ्या.किती वेळ अशा उभ्या राहाणार तुम्ही? आणि आम्ही दोघी साडीच्...